वैजापूर ता.- 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले तसेच आज 14 जानेवारी 2026 रोजी या घटनेला ३२ वर्ष झाले. त्या निमित्ताने येथील सर्व थरातील नागरिकांनी एकत्र येऊन त्यांनी नामविस्तार दिन साजरा केला.
आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विद्यापीठ नाम विस्तार दिन साजरा करतांना मान्यवर ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अकील सेठ व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी पुष्पहार टाकून अभिवादन करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व विद्यापीठ नामविस्तार दिनाचा जयघोष केला. त्यानंतर शहीद झालेल्या भीम सैनिकांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलतांना राजपूत यांनी, सर्व उपस्थिताना मुलांना उच्च शिक्षण द्यावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची घटनात्मक तत्वे पाळावी व सामाजिक बांधिलकी जपावी असा संकल्प दिला.
आयोजक नगरसेवक राजेश गायकवाड, प्रशांत त्रिभुवन, सुनील त्रिभुवन, आबासाहेब कसबे, साहेबराव पडवळ, विलास म्हस्के, अशोक तांबूस यांच्यासह सर्वांनी अभिवादन करून नामविस्तार दिनाचा जय घोष केला. या प्रसंगी बजरंग मगर, दिनेश राजपूत, सुनील पवार ,एम.आर.गणवीर, जगन गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, आबा जेजुरकर, श्रीकांत जाधव, जीवन पठारे, अभिषेक पवार, आशोक देवकर, संदीप राजपूत यांनीही अभिवादन केले. सुत्र संचलन धोंडीराम राजपुत यांनी केले आभार सुनील त्रिभुवन व राजेश गायकवाड यांनी मानले.
0 Comments