news today, बोरसर गटात शिवसेनेचा विजयाचा चेहरा - प्रभाकर जाधव

वैजापूर - सध्या बोरसर गटामध्ये एकच चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.जर शिवसेनेची उमेदवारी बोरसर सर्कलमधून प्रभाकर जाधव यांना मिळाली, तर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ही चर्चा केवळ कार्यकर्त्यांपुरती मर्यादित नाही, तर सर्वसाधारण जनतेच्या ओठावर आहे.
प्रभाकर जाधव हे नाव आज बोरसर, गारज आणि संपूर्ण वैजापूर तालुक्यात विश्वासाचं प्रतीक बनलं आहे. गेली २५ ते ३० वर्षे ते आमदार प्राध्यापक बोरणारे सर यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्षासाठी निष्ठेने काम करत आहेत. सत्ता असो वा नसो, पद असो वा नसो, त्यांनी कधीच आपली भूमिका बदलली नाही. हा गुण आजच्या राजकारणात दुर्मिळ आहे.
प्रभाकर जाधव हे केवळ पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, तर ते जनतेचे आपले माणूस आहेत. रोज सर्कलमध्ये फिरून लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणं, एखाद्या कुटुंबावर संकट आलं की धावून जाणं, महामार्गावर अपघात झाला तर मदतीसाठी सर्वात आधी पोहोचणं, ही त्यांची ओळख आहे. अशा प्रसंगी ते विचार करत नाहीत की हा माझा मतदार आहे की नाही, पक्ष कोणता आहे, फायदा काय होईल. त्यांच्यासाठी माणुसकी आधी आणि राजकारण नंतर आहे.

आज बोरसर गटातील सामान्य मतदार असं उघडपणे बोलतो की, आमच्यातला माणूस हवा.” आणि तो माणूस म्हणजे प्रभाकर जाधव. त्यांच्या कामाची पावती म्हणजे जनतेचा विश्वास. कुठलीही जाहिरात नाही, कुठलाही गाजावाजा नाही, पण लोकांच्या मनात त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे.
म्हणूनच बोरसर सर्कलमधून शिवसेनेची उमेदवारी जर प्रभाकर जाधव यांना मिळाली, तर त्यांचा विजय हा केवळ शक्यता नाही तर निश्चित वास्तव ठरेल, अशी ठाम भावना जनसामान्यांमध्ये आहे. हा विजय पैशावर नाही, ताकदीवर नाही, तर निष्ठा, सेवा आणि माणुसकीवर आधारित असेल.
शिवसेनेने जर निष्ठावंत, सर्वसामान्यांमध्ये राहणाऱ्या, संकटात धावून जाणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली, तर बोरसर गटातून शिवसेनेचा भगवा नक्कीच फडकत राहील, अशी खात्री जनतेला वाटत आहे.

Post a Comment

0 Comments