news today, 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय ; कृषिमंत्री भरणे यांची माहिती

राज्यातील 25 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार...

मुंबई, ता.15 - गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा चर्चेत असून राज्य सरकार लवकरच कर्जमाफीची घोषणा करणार आहे. येत्या 30 जूनपूर्वी याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्यातील कर्जमाफीच्या नव्या निर्णयामुळे सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


कर्जमाफी कशा पद्धतीने लागू करावी, यासाठी सरकारकडून  समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफी संदर्भातील रिपोर्ट देईल. तो रिपोर्ट आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे असे कृषिमंत्री भरणे म्हणाले. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी आणि इतर थकीत कर्जदारांना या निर्णयाचा लाभ होईल. राज्यातील कर्जमाफीच्या नव्या निर्णयामुळे सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे एकूण 35 हजार 477 कोटी रुपयांचे पीककर्ज थकीत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कर्जमाफीचा आराखडा अंतिम करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस,अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि बाजारभावातील चढउतार यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकाकडून घेतलेली पीक कर्ज थकली आहेत.



Post a Comment

0 Comments