छत्रपती संभाजीनगर, ता.25 - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन झाले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजुरकर,खा. डॉ.कल्याणराव काळे, आ.प्रदीप जयस्वाल,आ. अनुराधा चव्हाण तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते.
त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल आचार्य देवव्रत हे भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने शेगाव जि. बुलडाणाकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.
0 Comments