तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस.के उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालत पार पडली. मुख्य पॅनलप्रमुख म्हणून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. के.उपाध्याय, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए.बी.शेख, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ एन.एस.काळे, न्यायाधीश श्रीमती एस.के.खान, न्यायाधीश श्रीमती एम.एम.बेंद्रे यांनी काम पाहिले. ॲड.सोपान पवार, ॲड. संदीप कटारे, ॲड. राहुल धनाड, ॲड.अनुश्री पुंड, ॲड. सय्यद यासर अली यांनी त्यांना सहाय्य केले.
लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.मजहर बेग, सचिव ॲड.तुषार थोट, ॲड.प्रदीप बत्तासे, ॲड. संतोष जेजुरकर, ॲड.नवनाथ गायकवाड, ॲड. राजेंद्र शिरसाठ, ॲड.संदीप गायकवाड, जिल्हा सरकारी वकील ॲड. नानासाहेब जगताप, ॲड.एस.आर बारसे, न्यायालयीन उपाधीक्षक कामेकर, न्यायालय कर्मचारी अनिल साळवे, प्रशांत भुते, अतुल देवाकर यांनी परिश्रम घेतले. या लोक अदालतीमध्ये अपघात, वीज चोरी, धनादेश अनाधरण, मोटार वाहन कायदा, जुगार कायदा, भूसंपादन तसेच दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये एसबीआय बँक, महाराष्ट्र बँक व विविध फायनान्स कंपनीची वसुली प्रकरणे ठेवण्यात आली होती.
0 Comments