news today, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची बुधवारी निवड

पंचायत समिती सभापतींना मतदान करता येणार नाही..

छत्रपती संभाजीनगर, ता.12 - छञपती संभाजीनगर  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी बुधवारी (ता.18) विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही सभा होणार आहे.  पिठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी ही माहिती दिली.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड करण्यासाठीचा कार्यक्रम याप्रमाणे-

बुधवार ता.18 रोजी सकाळी 10 ते 12 नामनिर्देशन स्वीकारणे, दुपारी 2 वाजता विशेष सभेस सुरुवात, प्रथम प्राप्त नामनिर्देश पत्राची छाननी, त्यानंतर नामनिर्देशन पत्र माघारीसाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी (मराठी वर्णाक्षर क्रमानुसार) तयार करण्यात येईल. त्यानंतर प्रथम अध्यक्षपदासाठी व नंतर उपाध्यक्षपदासाठी एका पेक्षा जास्त उमेदवार असतील तर हात वर करुन मतदान घेण्यात येईल. हात वर करुन मतदान करणाऱ्या सदस्यांची स्वाक्षरी घेऊन नोंद घेण्यात येईल, या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती यांना विशेष सभेस हजर राहण्यास कळविण्यात आले आहे. तथापि, सभापतींना मतदान करता येणार नाही. असे पिठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी कळविले आहे. 

Post a Comment

0 Comments