news today, नारंगी धरणातून डाव्या व उजव्या कालव्याला पाणी सोडले

वैजापूर, ता.11 - शहरालगत असलेल्या नारंगी मध्यम प्रकल्पातून उजव्या व डाव्या कालव्याला बुधवारी (ता.11) पाणी सोडण्यात आले. आ.रमेश पाटील बोरनारे यांच्या सूचनेनुसार नांदूर मधमेश्वर कालवा विभागाने  उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडले असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

जिल्हा परिषद सदस्य श्रीराम गायकवाड यांच्याहस्ते पाणी पूजन करून कालव्यात पाणी सोडण्यात आले. या प्रसंगी नांदूर मधमेश्वर कालवा विभागाचे कनिष्ठ अभियंता पवन चव्हाण, श्रीमती सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. डावा व उजवा कालव्याचे लाभधारक शेतकरी दौलत गायकवाड, हंसराज गवळी, सागर गायकवाड, अरुण साळुंके, हरिभाऊ त्रिभुवन, बाळासाहेब साळुंके, विठ्ठल साळुंके, बाळासाहेब काळे, बापू रोठे, हरी निकम, अरुण साळुंके, कडू त्रिभुवन, संजय गायकवाड,
रवींद्र गायकवाड, उदय गायकवाड, किशोर गायकवाड, यशवंत गायकवाड, कृष्णा गायकवाड, वसंत गायकवाड, उमेश गायकवाड, रोहन गायकवाड, दादाहरी त्रिभुवन, अशोक शेळके, बाळासाहेब नाईकवाडी, गोकुळ शेळके, नवनाथ मोहन, ज्ञानेश्वर नाईकवाडी, भाऊसाहेब मतसागर, किशोर शेळके, विजय मतसागर व शेतकरी उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments