news today, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

मुंबई, ता.11 - शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी ता.12 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे प्रकरण कार्यतालिकेत 40 व्या क्रमांकावर सुनावणीसाठी निश्चित केले आहे. 3 वर्षांपासून सुनावणी चाललेल्या या प्रकरणात न्यायालय कोणता निर्णय देते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाला पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या केंदिय निवडणूक आयोगाच्या 2022 मधील निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने अंतिम युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी पुढील सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले होते.जानेवारीत वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नव्हती. आता येत्या गुरुवारी न्यायालय दोन्ही बाजूकडील अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा  लागल्या आहेत. शिवसेनेच्या प्रकरणात पक्षांतराबाबत महत्वपूर्ण निकाल अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेसह राजकीय वर्तुळाचे लक्ष शिवसेनेच्या सुनावणीकडे आहे.

पात्रतेचा फैसला होणार ...
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद,आमदार सुनील प्रभू यांनी स्वतंत्र याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे.


Post a Comment

0 Comments