news today, वैजापुरात आयटक अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वार्षिक मेळावा संपन्न

शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतनश्रेणीसाठी एकत्रित येऊन लढणे गरजेचे  - कॉम्रेड शालिनी पगारे

वैजापूर, ता .15 - अंगणवाडी सेविकांना अनेक किचकट कामे आहेत, परंतु त्या बदल्यात त्यांना अत्यल्प मानधन मिळते.  त्यांच्या वेतनश्रेणीसाठी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळवण्यासाठी मागील अनेक वर्षापासून आयटकचे लढे सुरू आहेत. हे लढे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आंदोलने करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या राज्य सचिव उमरेड कॉम्रेड शालिनी पगारे यांनी केले. त्या वैजापुरात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वार्षिक मेळाव्यात बोलत होत्या. 

वैजापूर पंचायत समिती सभागृहात (१२ मार्च) रोजी पार पडलेल्या या मेळाव्यात नवनिर्वाचित सभापती वंदनाताई शिंदे, उपसभापती सोनाली जाधव, पर्यवेक्षिका शोभा साळवे, योजना जमधाडे, तालुकाध्यक्ष शोभा तांदळे, कल्पना माळी, शबाना शेख, सोनी चव्हाण, पंचशिला धनेश्वर, शशिकला तांबे, अशा हारदे, शीतल राजपूत, सोनाली मगर, रत्ना गोंधळे, मंदाकिनी जाधव , अनिता मतसागर, निर्मला बोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयटक युनियनच्या राज्य सचिव कॉम्रेड शालिनीताई पगारे यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे नियमितकरण करण्यासाठी तसेच ग्रॅच्युईटी करिता पुकारलेले दिल्ली येथील २० मार्चच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, दरम्यान, नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला.तर जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार मिळालेल्या लोणी खुर्द बीटच्या पर्यवेक्षिका योजना जमदाडे यांचा शालिनी पगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यासाठी शिऊर, खंडाळा, लाडगाव, पालखेड, लोणी खुर्द तसेच महालगाव विभागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचलन सुवर्णा पवार यांनी केले. 


Post a Comment

0 Comments