वैजापूर ता.16 - "सशक्त महिला - सशक्त परिवार," यास्तव प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना सन -2025 -2026 प्रचार व प्रसिद्धी या घटकाअंतर्गत सोमवारी (ता.16) येथील निर्मला इन्स्टिटयूट येथे महिला शेतकरी गट व महिला स्वयंम सहायता गट कार्यशाळा संपन्न झाली .
महिला बचत गट याना विविध व्यवसाय व उद्योग या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. उद्योग व्यवसायासाठी अनुदान कसे प्राप्त करावे व स्वावलंबी कसे बनावे ? या विषयी सखोल माहिती देण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर येथील शासनच्या कृषी विभागाचे कृषी उपसंचालक दीपक गवळी व वैजापूरचे उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी तालुक्यातील एकत्र आलेल्या महिला बचत गटाच्या महिला व पुरुषांना स्वावलंबी बनण्यासाठी व बचत गटामार्फत चालविण्यात येणारे उद्योग, पिकांवर कीटक पडले असतांना घ्यावयाची खबरदारी व उपाय योजना याविषयी माहिती दिली तसेच "महाविस्तार एआय अप" डाऊन लोड करून दिला व काही समस्या असल्यास त्यांचे भ्रमण ध्वनी देऊन संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, डॉ. प्रतिमा सोनवणे, संतोषी भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. आरंभी विद्येची दैवत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्तविक इन्स्टिट्यूटच्या मार्गा रेट दिब्रेटो यांनी केले. तारीका इक्का यांनी सहकार्य केले. या प्रसंगी कृषी खात्याचे श्री थत्ते, गंगापूर तालुका कृषी अधिकारी जायभाए, श्री.गांगुर्डे, श्री शिनगारे, कृषी सहायक थोरात, अनिल बनकर, अक्षय बनकर, श्रीमती पंडित, श्याम पाटील व कृषी सहायक उपस्थित होते, सूत्र संचलन इरफान सय्यद यांनी केले. तारीका इक्का यांनी आभार मानले.
0 Comments