वैजापूर ता.07 - येथील रहिवाशी संतोष धोंडीरामसिंह राजपूत यांची कन्या युविका राजपूत हीने आय.आय.टी.मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या जानेवारी 2026 च्या राष्ट्रीय पातळीवरील डिझाईन आय.आय.टी प्रवेश परीक्षेत खुल्या प्रवर्गात राष्ट्रीय पातळीवर 15 वी रँक प्राप्त करून ही अत्यंत स्पर्धात्मक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. या राष्ट्रीय स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेला देशभरातून वीस हजार विद्यार्थी बसले होते.
या अभ्यासक्रमासाठी देशात आय.आय.टी कॉलेजमध्ये फक्त 245 जागाच आहेत. या प्रवेश परीक्षेत डिझाईन क्षमता, निरीक्षण क्षमता, तार्किक क्षमता, समस्या निवारण क्षमता इत्यादी निकषसह बुद्धीमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान चाचणी अशा विविध विषयांवर आधारित ही स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा असते. युविकाच्या या राष्ट्रीय पातळीवर यशाबद्दल सर्वत्र तीचे अभिनंदन होत आहे. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांची युविका नात आहे.
0 Comments