news today, वैजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या चार रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक

वैजापूर, ता.20 - विवीध कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीच्या जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, वैजापूर तालुक्यातील रोटेगाव, कनकसागज, नादी व वांजरगाव या ग्रामपंचायतीच्याप्रत्येकी एका जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे.
   
या कार्यक्रमानुसार ३० मार्च रोजी नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ७ ते १३ एप्रिल या कालावधीत इच्छुक उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात येणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राची १५ एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. १७ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेता येतील. त्यानंतर आवश्यकता पडल्यास २८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे. वैजापूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या चार जागा रिक्त आहेत. वांजरगाव येथील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील एक जागा रिक्त आहे. कनकसागज येथील अनुसूचित जाती महिलाची एक जागा, नादी येथील अनुसूचित जाती महिला एक जागा व रोटेगाव येथील सर्वसाधारण प्रवर्गातील एक अशा एकूण चार जागा रिक्त आहेत.

Post a Comment

0 Comments