यावर्षी संपूर्ण जगात रोगराई व महागाई वाढणार, मानवी संहार होणार, पीक पाणी समाधानकारक राहणार...
वैजापूर ता.19 - यावर्षी संपूर्ण जगात भीषण रोगराई वाढणार, महागाई वाढणार, मानवी संहार मोठ्या प्रमाणात होईल, पीक पाणी समाधानकारक राहणार असून पाऊस मध्यम स्वरूपात पडणार तसेच बाजारात तेजी मंदी राहणार असे भाकीत पाडव्याच्या एक दिवस आधी म्हणजे दर्श अमावस्या दिनी
बुधवारी (ता.18) येथील स्मशानभूमीत ज्या ठिकाणी पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले होते त्या ठिकाणी "इंद्रराज गुढी"उभारल्या नंतर पाडव्याच्या दिवशी पुरोहित सुभाष हतवळणे यांनी केले. गुरुवारी (ता .19) शहरातील पाटील गल्लीतील मारोती मंदिरात हे भाकीत ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
वैजापूर स्मशानभूमीत उभारलेली इंद्रराज गुढी व नागरिक ...
या प्रसंगी या गुढी चे मानकरी दीपक सोपानराव साळुंके, मधुकर साळुंके तसेच जेष्ठ पत्रकार घन:श्याम वाणी, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, बाबुराव घोडके, बापू गावडे,अशोक साळुंके, अरविंद साळुंके, किशोर साळुंके आदींची प्रमुख उपस्थितीती होती.
पाडव्याच्या आदल्या दिवशी स्मशानात ज्या ठिकाणी पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले ती जागा सडा शिंपडून स्वच्छ करण्यात येऊन एकूण 18 खड्डे करण्यात आले. 12 खड्डे 12 मराठी महिने, चार दिशेला चार खड्डे व 2 खड्डे राजा भाग व प्रजा भाग या प्रत्येकात 21 ज्वारीचे दाणे टाकून ते रुईच्या पानांनी झाकण्यात आले. तसेच उत्तरेला इंद्रराज गुढी उभारण्यात आली, व पुरोहित यांनी विधिवत पूजा केली , दीपक साळुंके, मधुकर साळुंके, घन:श्याम वाणी, धोंडीरामसिह राजपूत, बाबुराव घोडके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
रात्री अडीच वाजता दीपक साळुंके यांनी या गुढी जवळ नैवेद्य ठेवला. पहाटे सात वाजेपर्यंत काक स्पर्श व्हावा म्हणून वाट पाहण्यात आली. परंतु याही वर्षी काक स्पर्श झाला नाही. नंतर सर्वांच्या उपस्थित खड्ड्यातील दाणे मोजण्यात आले यात चैत्र महिन्याच्या खड्ड्यात 21 दाणे मिळाले व अश्विन महिन्यात 23 दाणे आढळून आले. या महिन्यात तेजी-मंदी राहणार, राज भाग खड्ड्यात 1 दाना वाढून ते 22 आढळले तर प्रजा भागात 25 दाणे आढळले यावरून भाकीत की प्रजा सुखी राहणार व राजा ही आनंदी राहणार, शेतकरी पीक पाणी समाधानकारक राहील, शेती माल भाव मात्र कमी जास्त राहणार यावरून वरील भाकीत करण्यात आले..राज्यात फक्त वैजापूर व पैठण येथेच अशी स्मशानभूमीत गुढी उभारुन पाडव्याच्या दिनी भाकीत केले जाते.
0 Comments