छत्रपती संभाजीनगर, ता.25 - बीएलओ मार्फत 30 मार्च अखेर मतदार यादी मॅपिंग व पडताळणी मतदार यांच्या घरी भेटी देऊन पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुपारवायझर यांना दिले.
जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये सुपरवायझर यांची प्रशिक्षण कार्यशाळा दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षणात उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार नीलेश अपार उपस्थित होते .
मतदार यादीतील नावाची पडताळणी, नवीन मतदाराचा समावेश, स्थलांतर झाले असल्यास नोंद घेऊन मतदाराच्या संमतीने कोणत्याही एका ठिकाणी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. बीएलओ मार्फत होणाऱ्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा सुपरवायझर यांनी घ्यावा, जेणेकरून निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील निवडणूक यादीचे मॅपिंगचे काम पूर्ण होईल.
मतदान केंद्रस्तरीय निरीक्षक यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, जिल्ह्याच्या मतदार यादी पुनर्रनिरक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीचे मॅपिंग करण्याचे उद्दिष्ट 90 टक्क्यापर्यंत दिनांक 30 मार्च अखेर पूर्ण करावे. यासाठी सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे घटक बीएलओ आणि सुपरवायझर यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. तसेच शासकीय सुट्टीच्या दरम्यान देखील प्राधान्याने मतदार यादीचे मॅपिंग करण्याचे निर्देश स्वामी यांनी दिले.
एक हजार मतदार संख्या असलेल्या मतदान केंद्रासाठी एक बीएलओ आणि दहा बीएलओ च्या कामकाजासाठी एक सुपरवायझर नेमण्यात आले आहेत. सर्वांनी मॅपिंग करीत असताना मतदाराच्या घरी जाऊन दोन अर्ज देऊन माहिती भरून घ्यावी. ती माहिती एक अर्ज स्वतः कडे घेऊन 2002 सालच्या मतदार यादी सोबत माहितीची खातरजमा करावी. मॅपिंग करताना2082 च्या मतदार यादीनुसार मतदाराचे नाव आले का तपासणे. ज्यांचे यादीत नाव नाही ते समावेश करणे, तसेच नवमतदार कोठे होते ते तपासणे आवश्यक आहे. हे करीत असताना याबाबत मतदाराना विचारणा करण्यात यावी .18 वय वर्ष असणारे मतदार यांचे पालक, आई वडील यांच्या कुटुंबियातील सदस्याची माहितीच्या आधारे यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे. जिल्ह्यातील मतदारयादीचे मॅपिंगचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश स्वामी यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात सुपारवायझर यांना दिले.
0 Comments