वैजापूर शहरातील रोटेगाव स्टेशन रोडवरील घटना ...
वैजापूर, ता.28 - भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक ठार व अन्य एक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता 28) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास शहरातील वैजापूर शहरातील स्टेशनरोडवर घडली. माधव मुरलीधर दळवी (वय 77 वर्ष, रा. शिवप्रतापनगर, वैजापूर) असे मृताचे नाव असून त्यांच्या पत्नी पुष्पलता दळवी (वय 67 वर्ष) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, दळवी दांपत्य हे दुचाकीने जात असताना स्टेशन रस्त्यावर एका कापड दुकानासमोर वळण घेतेवेळी शहराच्या दिशेने येणाऱ्या कारने (एम.एच.14, जे.आर.7998)
त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दळवी दाम्पत्य हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी माधव दळवी यांना तपासून मृत घोषित केले तर पुष्पलता दळवी यांना शहरातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.
अपघातानंतर कारचालक वाहनासह फरार झाला.घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक आर.आर.जाधव, पोलिस कॉन्स्टेबल पैठणकर, सुंदर्डे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणात वैजापूर पोलिसांत वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलिस करीत आहे.
0 Comments