वैजापूर, ता .26 - वैजापूर शहरात श्री रामजन्मोत्सव उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गुरुवारी (ता.26) दुपारी ठीक 12 वाजता येथील मार्केट यार्ड मधील श्रीराम मंदिरात नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी व सौ.शिल्पा परदेशी यांनी प्रभू रामचंद्र यांची आरती केली.
यावेळी उपस्थित भाविक -भक्तांनी प्रभू रामचंद्र नामाचा एकच गजर केला. "जय श्रीराम" सियावर रामचंद्र की जय, रामभक्त हनुमान की जय", "राम सीता जानकी - जय बोलो हनुमानकी "
अशा गगन भेंदी जय घोषात प्रभू रामजन्मोत्सव उत्साहात साजरा केला. शहरातील संकट मोचन हनुमान मंदीर, ब्रह्मचारी मंदिर, पाटील गल्ली मंदिर, काटे मारोती मंदिर अशा विविध मंदिरात प्रभू रामजन्मोत्सव आनंद व ऊत्साहात साजरा होऊन भक्त भाविकांना महाप्रसाद वाटप ही करण्यात आले.
मार्केट यार्ड मधील राम मंदीरात हजारो भाविक रांगा लावून दर्शन व प्रसाद घेत होते. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेरखान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अकिल शेख, ज्येष्ट नेते भगवाननाना तांबे, मार्उचअंत बँकेचे उपाध्यक्ष उल्हास ठोंबरे, सीताराम व्यवहारे, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, सावनसिंग राजपूत, नगरसेवक पारस घाटे, जिल्हा परिषद सदस्य श्रीराम गायकवाड, सौरभ संचेती, उत्सव समितीचे सर्वश्री सुरेश तांबे, सतीश गुरू कुलकर्णी, विनायक व्यवहारे, प्रकाश व्यास, राजू व्यवहारे, अशोक शिंदे, संतोष पवार, अतुल बसवेकर, शशिकांत पवार, जितेंद्र कासलीवाल, बद्रीनाथ तांबे, अशोक पैठणे, राजू शेठ मालपाणी, पारस बोहरा, सोनू राजपूत,
यांच्यासह व्यापारी वर्ग व भक्त भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
सायंकाळी शहरातून श्रीराम पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
0 Comments