news today, वैजापूरात श्रीरामनवमी यात्रा महोत्सवानिमित्त शोभा मिरवणूक व विविध कार्यक्रम उत्साहात


वैजापूर ता.27 - श्रीरामनवमी यात्रा महोत्सवानिमित्त प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक शुक्रवारी (ता.27) सायंकाळी शहरातून आली. यानिमित्ताने उत्सव समितीच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मार्केट यार्ड परिसरातील श्रीराममंदिर पासून ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत काढण्यात आली, उत्सव समितीचे निखिल कासलिवाल, सुरेश तांबे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, सतीश कुलकर्णी (गुरू), अशोक  पैठणे (गुरू), दादा राऊत, कचरू राजपूत, सचिन राजपूत, अशोक शिंदे, संतोष पवार, विनायक व्यवहारे यांच्या उपस्थितीत शोभा यात्रा आरंभ झाली. या मिरवणूकित दक्षिण भारतातील कलाकारांनी आपल्या नृत्य कलेने सर्वांचे लक्ष वेधले होते.

शोभा मिरवणूकप्रसंगी निखिल कासलीवाल, धोंडीरामसिह राजपूत, अशोक शिंदे, सुरेश तांबे, संतोष पवार

या जन्मोत्सव कार्यक्रम व यात्रेनिमित्त सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले होते, तसेच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर ही घेण्यातआले. शोभा मिरवणूकीनंतर राम मंदिर परिसरात रात्री नऊ वाजेनंतर वाजता शोभेची दारू ही सोडण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व नागरिक व उत्सव समिती सदस्यांनी सहकार्य केले. यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Post a Comment

0 Comments