news today, हरियाणा येथील एकाचा अकस्मात मृत्यू


वैजापूर, ता.26 - हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथील रहिवासी असलेल्या एका 49 वर्षीय व्यक्तीचा वैजापूर तालुक्यातील गारज रस्त्यावर अकस्मात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. महेंद्रसिंग शिवदयासिंग असे मृत व्यक्तीचे नाव असून ते शिवदयाल चापरी, चंदेरी पार्ट 240 कुरुक्षेत्र येथील राहणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
    
बुधवारी सकाळी गारज रस्त्यावर बेशुद्धावस्थेत आढळून आल्यानंतर त्यांचे मित्र विशाल सरोवर यांनी त्यांना तातडीने देवगाव रंगारी (तालुका कन्नड) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासुन मृत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून शिऊर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक गोरक्ष हे करत आहेत

Post a Comment

0 Comments