news today, 'समृध्दी'वर कारचा भीषण अपचात ; एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

वैजापूरनजीक जांबरगांव टोलनाक्या जवळील घटना...

छञपती संभाजीनगर येथील अजमेरा कुटुंबावर काळाचा घाला 


   अपघातात मृत पावलेले पवन अजमेरा व जाळून खाक        झालेली क्रेटा कार ...

वैजापूर, ता.14 - तालुक्यातील जांबरगाव शिवारातील समृद्धी महामार्गावर सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला .
समोरून जाणाऱ्या ट्रकला धडकून कारला लागलेल्या आगीत कारमालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले. 

पवन वर्धमान अजमेरा (वय 52 वर्ष रा. छत्रपती संभाजीनगर) असे या घटनेतील मृताचे नाव असून त्यांची पत्नी वीणा पवन अजमेरा (वय 47 वर्ष) व मुलगी ईशा पवन अजमेरा (वय 20 वर्ष) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना वैजापूर 
उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अजमेरा कुटुंबीय हे क्रेटा कारने (एम.एच.20, एफ.यू 4527) छत्रपती संभाजीनगरला जात होते. जांबरगावजवळ पोहचल्यावर कारने समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक दिली व त्यानंतर या ट्रकने कारला फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. धडक इतकी भीषण होती की कारने क्षणार्धात पेट घेतला. काही क्षणांतच आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण कार वेढली. त्यावेळी कारमध्ये पवन अजमेरा, त्यांची पत्नी व मुलगी प्रवास करत होते. 

अपघाताची बातमी मिळताच महाराष्ट्र सुरक्षा बल, स्थानिक पोलीस व समृद्धी अग्निशामन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली व वीणा व ईशा या दोघीना कारच्या बाहेर काढले. पण कार चालक पवन अजमेरा यांचे पाय पुढील बाजूस फसल्याने व काही वेळात गाडीचा स्फोट झाल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कार पूर्णपणे जळून खाक झाली.

दरम्यान, अपघातानंतर जळालेली कार महामार्ग क्रेनच्या साहाय्याने हटवून वैजापूर-मुंबई एक्झिट टोल नाक्यावर हलवण्यात आली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.








Post a Comment

0 Comments