news today, वैजापूर येथे राष्ट्रीय लोक अदालतीत 124 प्रकरणांचा निपटारा ; एकूण 89 लाख रुपयांची वसुली

वैजापूर, ता.09 - येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयात शनिवारी (ता.09) रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयीन प्रलंबित 119 व वादपूर्व 05 अशी एकूण 124 प्रलंबित व वादपूर्व प्रकरणात तडजोड होऊन 89 लाख रुपयांची वसूली करण्यात आली.


या राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन विधी सेवा समिती अध्यक्ष  तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.के.उपाध्याय यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. लोक अदालतचे उदघाटन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल.जी.पाच्छे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी दिवाणी न्यायाधीश डी.एस पिसाळ, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस.काळे, न्यायाधीश श्रीमती एस.के.खान, न्यायाधीश श्रीमती एम.ए.बेंद्रे, वकील संघाचे अध्यक्ष मजहर बेग, सचिव तुषार थोट यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पॅनल पंच म्हणून ॲड.भारती पडवळ, ॲड.गोरख उकिरडे, ॲड. अफसर पठाण, ॲड.कुलदीप साळवे यांनी काम पाहिले. या लोक अदालतीत दिवाणी, फौजदारी, चलनक्षम दस्तऐवज (परक्राम्य लेख अधिनियम), विद्युत प्रकरण, जमिन अधिग्रहण, मोटार अपघात व इतर स्वरूपांचे प्रकरणे ठेवण्यात आलेले होते. यात 119 प्रलंबित व 5 वादपुर्व अशा एकूण 124 प्रकरणांचा तडजोडीअंती निपटारा करण्यात आला. यात प्रलंबित प्रकरणांत 70 लाख 53 हजार 555 रुपये तसेच वादपुर्व प्रकरणांत 18 लाख 24 हजार 945 रुपये अशी एकूण 88 लाख 78 हजार 500 रुपयांची वसुली करण्यात आली.

लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सरकारी अभियोक्ता के.एस. गंडे, वकील संघाचे सभासद ॲड.एस.एस.ठोळे, आर.डी.थोट, पी.एस.साखरे, एच.एम.पठाण, आर.पी.बोडखे, ए.एम.बागुल, जे. डी. हरिदास, व्ही.जी.वाघ, पी.आर.बत्तासे, संतोष जेजुरकर, सचिन जानेफळकर, आर.डी. शिरसाठ, अनिल रोठे, सईद अली, विष्णु सवाई, इफ्तेखार शेख, डी.बी.बावचे, वाय.एन.थावरे, किशोर मतसागर, पांडुरंग पवार, वैभव ढगे, नितीन बोराडे, मुजाहिद शेख, जावेद बेग, संदीप गायकवाड, शुभम बोढरे, कामील शेख, प्रतीक्षा उबाळे, माया जाधव, ज्योती मगर, मयुरी साळुंके, अनुश्री पुंड तसेच न्यायालयीन अधीक्षक यू.यू.तुंगार, कर्मचारी अनिल साळवे, प्रकाश शिंदे, प्रशांत शिंदे, राम गोरे, अतुल दिवाकर, आनंद दाबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

जिल्हा सरकारी वकील अँड नानासाहेब जगताप, ज्येष्ठ सदस्य अँड प्रमोद जगताप,अँड. रियासत अली, अँड. के.बी.कदम, अँड.राजेंद्र हरिदास, अँड अशोक चव्हाण, अँड.प्रताप निंबाळकर, अँड.सोपान पवार, अँड.एन.आर.गायकवाड, अँड.आर.डी. सिरसाठ, अँड. राजपूत, अँड. रविराज शिंदे, अँड. महेश कदम, अँड. संदिप डोंगरे, अँड. किरण त्रिभुवन, अँड. देवदत्त पवार उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments