वैजापूर, ता.09 -वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे शुक्रवारी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास चोर आल्याचा बहाणा करत दोन अनोळखी व्यक्तींनी एका महिलेच्या 90 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडुबाई सिताराम राऊत (65 वर्ष) या वृद्ध महिला छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर त्रिमूर्ती पाठा गॅरेज, शिऊर बंगला या ठिकाणी राहतात. सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेला चोर आल्याचे सांगत दागिने कागदामध्ये बांधून देतो असे सांगून गळ्यातील सोन्याचे मणी असलेले मणी मंगळसूत्र व अन्य दागिने असे 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लबाडीच्या उद्देशाने लंपास केला. याप्रकरणी कडुबाई राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल आघाडे हे करीत आहेत.
0 Comments