आठ शाळांचे निकाल १०० टक्के ...
वैजापूर, ता .08 - दहावीच्या परीक्षेत वैजापूर तालुक्यातील ८६.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. यावर्षी निकालात काही प्रमाणात घसरण झाल्याचे निकालावरून दिसते.
या निकालानुसार, वैजापूर तालुक्यातील जवळपास सत्तर परीक्षा केंद्रावर चार हजार ७१० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८६. ७० टक्के म्हणजेच चार हजार ८४ विद्यार्थां यशस्वी ठरले आहेत. यात ९१२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून एक हजार ४५९ विद्यार्थां प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. चिंचडगाव येथील रामकृष्ण विद्यालयाचा निकाल सर्वात कमी म्हणजे केवळ १६ टक्के लागला आहे. या शाळेतील २५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ चार विद्यार्थी पास झाले आहेत.
तालुक्यातील आठ शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. या शाळा पुढीलप्रमाणे ...
जय बालाजी आदिवासी आश्रम शाळा,
शिऊर संत जनार्धन स्वामी विद्यालय, संवंदगाव
दादासाहेब पाटील पब्लिक स्कूल
विद्याधन इंग्लिश स्कूल,
राजे शिव छत्रपती भारतीय संस्कार विद्यामंदिर
छत्रपती इंटरनॅशनल स्कूल
दिवंगत अशोक पाटील इंग्लिश स्कूल
वंडर किडस इंग्लिश स्कूल
वैजापूर शहर व परिसरातील काही शाळांचे निकाल पुढीलप्रमाणे
जिल्हा परिषद कन्या प्रशाला (७१.०५)
न्यू हायस्कूल, वैजापूर (८४. ४८)
सेंट मोनिका इंग्लिश स्कूल वैजापूर (९८.२६)
हल्क ए दवानायक उर्दू गर्ल्स हायस्कूल (८९.२८)
नूतन कन्या विद्यामंदिर (९१. ६६)
उर्दू माध्यमिक स्कूल, हल्क ए दवानायक (९०. ३८)
0 Comments