वैजापूर ता.07 - येथील संचेती परिवारातील सराफा व्यापारी नंदकुमार रिखबचंद संचेती यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (ता.06) रात्री नऊ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 63 वर्ष होते.
माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती व उद्योगपती जीवनलाल संचेती यांचे ते चुलत भाऊ होत. कै.नंदकुमार संचेती यांच्या पश्चात्य पत्नी, आई व मुलगा अल्पेश असा परिवार आहे.
येथील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंतिम संस्कार करण्यात आले.माजी नगराध्यक्ष बाळासाहेब
माजी आ.भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी,माजी नगराध्यक्ष साबेरखान, राहता नगराध्यक्ष राजुशेठ पिपाडा, बाळासाहेब जपे, जीवनलाल संचेती, राष्ट्रवादी काँग्रेसचे हाजी अकील सेठ, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशसेठ बोथरा, प्रशांत पाटील सदाफळ, नगरसेवक दशरथ बनकर,
दिलीप मुगदिया, गिरीश चापानेरकर, प्रा.जवाहर कोठारी, आप्पा रक्ताटे, घनश्याम वाणी, पारस घाटे, ज्ञानेश्वर टेके, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत राजुसिंग राजपूत, लिमेश वाणी, बाबासाहेब पुतळे, संतोष बोथरा, निलेश पारख यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
0 Comments