news today, विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीरस्थानिक


छत्रपती संभाजीनगर, ता.18 - औरंगाबाद - जालना स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून गुरुवार ता.18 जून रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सविता चौधर यांनी दिली आहे.



औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी विधानपरिषद द्विवार्षिक निवडणुकीचा जाहीर झालेला कार्यक्रम याप्रमाणे 

निवडणूक अधिसुचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक सोमवार ता.25 मे 2026
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक सोमवार दि.1 जून 2026 
नामनिर्देशन पत्राची छाननी मंगळवार दि.2 जून 2026 
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि.4 जून 2026
मतदानाचा दिनांक गुरुवार दि.18 जून 2026
मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायं.4 वा. पर्यंत 
मतमोजणीचा दिनांक सोमवार दि.22 जून 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक गुरुवार दि.25 जून 2026
या कार्यक्रमाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments