.
या पहिल्याच बैठकीत प्रशासक काळातील विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध प्रमुख विभागांचा विभागनिहाय आढावा घेऊन पुढील नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम विभाग, सिंचन व पाणीपुरवठा विभाग, पशुवैद्यकीय विभाग,महिला-बालकल्याण विभाग, समाज कल्याण विभाग या विभागांचा आढावा घेण्यात आला:..
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनू पी.एम, उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड, महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षीताई पवार, समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के, स्थायी समिती सदस्य पंकज ठोंबरे, संजय पाटील निकम, मनोज गायके यांच्यासह स्थायी समिती सदस्य, सर्व विभाग प्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते
0 Comments