2005 पासून त्यांनी वैजापूर न्यायालयात वकील व्यवसायास सुरुवात केली होती. मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते ओळखले जात. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.
प्रकृती अस्वास्थ त्यातच कावीळ झाल्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून छञपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
बुधवारी (ता.20) सकाळी नऊ वाजता शहरातील नौगाजीबाबा दर्गा परिसरातील कब्रस्थानमध्ये त्यांचा अंत्यविधी होणार आहे.
0 Comments