वैजापूर, ता.06 - वैजापूर जिल्हा न्यायालयात कायर्रत असलेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस.के. उपाध्याय यांची मुंबई येथे तर दिवाणी न्यायाधीश एस.के.खान यांची मालेगांव येथे बदली झाली. वैजापूर व गंगापूर वकील संघ तसेच वकील संघ ग्राहक सोसायटीच्यावतीने मंगळवारी (ता.05) निरोप देण्यात आला.जिल्हा न्यायाधीश म्हणून त्यांच्या कामाची दखल घेऊन न्या.श्रीमती उपाध्याय यांना बढती देण्यात आली आहे.
या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल.जी.पाच्चे होते. दिवाणी न्यायाधीश डी. एस. पिसाळ, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस.काळे, न्यायाधीश श्रीमती एम ए बेंद्रे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा वकील संघ व ग्राहक संस्थेतर्फे वकील संघाचे अध्यक्ष ॲड.मजहर बेग, सचीव ॲड.तुषार थोट, सोसायटीचे चेअरमन ॲड.सोपान पवार, ॲड.प्रमोद जगताप यांनी न्या.उपाध्याय व खान यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सरकारी वकील कृष्णाजी गंडे, अँड आर. डी.थोट, सरकारी वकील अँड. संजय बारसे, अँड अंभोरे, अँड राजेंद्र हरिदास, अँड.एस.एस.ठोळे, अँड.अशोक चव्हाण, गंगापूर जिल्हा वकील संघाचे अँड ठोंबरे, अँड.ए.एम.बागुल, अँड. रामकृष्ण बोडखे, अँड राजू शिंदे, अँड.अनिल रोठे, अँड.महेश कदम, अँड संतोष जेजुरकर, अँड प्रदीप बत्तासे, अँड.एच.एम. पठाण, अँड.आर.डी.सिरसाठ, अँड. राजपूत, अँड.व्हि.जी.वाघ, अँड.किरण त्रिभुवन, अँड.नितीन बोराडे, अँड.निखिल हरिदास, अँड.देवदत्त पवार, अँड.गोरे, अँड श्रेणिक कोठारी, अँड.इम्रान, अँड.आकाश ठोळे, अँड. बाबासाहेब अडानगळे, अँड. कुणाल हरिदास, अँड शैलेश पोंदे, अँड. धनाड, अँड.कटारे, अँड. यासर अली, अँड.जावेद बेग, अँड. कुलदीप बागुल, अँड कुणाल बागुल यांच्यासह महिला वकील व न्यायालयीन कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
अँड. डि. टि.डघळे यांनी सुत्रसंचलन केले तर आभार अँड. तुषार थोट यांनी मानले.
0 Comments