आ.बोरणारे यांची विधानसभेत लक्षवेधी सूचना ; गुटखा विक्रीवर ठोस कारवाईची मागणी
वैजापूर, ता. 05 /प्रतिनिधी -
राज्यात 2012 पासून गुटखा विक्रीवर बंदी असताना गुटखा मिळतोच कसा ? अशी लक्षवेधी सूचना आ.रमेश पाटील बोरणारे यांनी शुक्रवारी (ता.05) विधानसभा अधिवेशनात मांडली. शहर व तालुक्यात खुलेआम गुटख्याची विक्री होत असून गुजरात राज्यातून तालुक्यात येणाऱ्या गुटख्यावर कारवाई कारवाई होणार का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राज्यात गुटख्यावर बंदी असताना शहर व ग्रामीण भागात गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. या मुद्द्यावर आ. कृष्णा खोपडे, महेश घोरपडे, नारायण कुचे, विक्रम पाचपुते व श्वेता महाले या आमदारांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. यावर आ. बोरणारे यांनीही आपले मत व्यक्त करून राज्यात गुटख्यावर बंदी असताना गुटखा मिळतोच कसा असा प्रश्नही उपस्थित केला. वैजापूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात गुटख्याची सर्रास विक्री सुरू असून कुठलीही ठोस कारवाई होत नाही.शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयाच्या परिसरात खुलेआम गुटख्याची विक्री होते. शालेय विद्यार्थ्यांना गुटख्याचे व्यसन लागले आहे. यापूर्वी अनेकवेळा टेम्पो व ट्रक भरून आलेला गुटखा पकडण्यात आला मात्र ठोस कारवाई झालेली नाही. गुजरात राज्यातून वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा येत असून यावर आपण काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित करून राज्यात सर्रास होणाऱ्या गुटखा विक्रीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आ. बोरणारे यांनी केली.
0 Comments