सदगुरूच्या परंपरा हेच आमच्यासाठी धर्मकार्य - महंत रामगिरी महाराज
वैजापूर, ता.19 / प्रतिनिधी - 'लेने को हरिनाम देणे को अन्नदान' या उक्तीला अनुसरून 200 वर्षांपूर्वी योगीराज गंगागिरी महाराजांनी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह सदगुरूंचे कार्य आहे. 1984 ला ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराजांनी याच परिसरात सप्ताह करावा अशी इच्छा व्यक्त केली होती. याच परिसरात शिवगिरी आश्रम बाजाठाण येथे आम्हीही 14 वर्ष राहिलेलो आहे. सप्ताह दैदिप्यमान होईल असे महाराज म्हणाले. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र गोदाधाम सराला बेटाचा सप्ताह शनिदेवगाव सप्तक्रोशीतील शनिदेवगाव, चेडुकळ, बाजाठाण ,अव्वलगाव, हमरापुर ,कमलपुर, भामाठाण या सात गावाच्या नियोजनातून होत आहे.
गिनीज बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद असलेला येत्या 30 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान पार पडणार्या सदगुरू योगिराज गंगागिरी महाराज 178 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण सोहळा, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते,भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत निसर्गरम्य गोदाकाठी हा सोहळा पार पडला.
यावेळी उपस्थित हजारो भाविकांना मार्गदर्शन करताना, महंत रामगिरी महाराज म्हणाले की, हा सप्ताह म्हणजे आपल्या गोदाधाम सराला बेटाचा महाकुंभचा असून ही गुरुपरंपरा हेच आमच्यासाठी धर्मकार्य आहे. गुरूंच्या परंपरा पुढे नेत हे कार्य वाढवायचे आहे. पूर्वीच्या काळी साधुसंत एकांत साधून तपश्चर्या करत आज आपल्याला विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालत हा सप्ताह गोदावरीच्या काठी देवगाव शनी व सप्तक्रोशीत दैदिप्यमान बनवायचा आहे हा परिसर बेटाशी जोडलेला असून नियोजन सुंदरच होईल असे महाराज म्हणाले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार संदिपान भुमरे, आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, डॉ. दिनेश परदेशी, अविनाश पाटील गलांडे, वंदनाताई मुरकुटे, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज, शिवगिरी आश्रमाचे संदीपान महाराज, योगानंद महाराज, नवनाथ महाराज मस्के, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------
योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या 178 व्या अखंड हरिनाम सप्ताह ध्वजारोहणासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले मंत्री राधा कृष्ण विखे पाटील म्हणाले की, महंत रामगिरीजी महाराज हे सनातन हिंदची भुमिका परखडपणे मांडत आहेत महाराज धर्माचे कार्य करत असून त्यांनी लाखो युवक आपल्या गंगागिरीजी महाराज भव्त परिवारात जोडला आहे त्यांच्या सानिध्यात आल्यावर आध्यात्मिक शांती मिळते आम्ही शासनाच्या वतीने देवगावशनी येथील उच्च पातळीच्या बंधाऱ्याचे काम लवकरच सुरू करणार असून या सप्ताहामध्ये मिळेल ती सेवा करण्यास तयार आहे या सप्ताहातील एकादशी ची फराळ पंगत खासदार संदिपान भुमरे साहेब वआमदार प्रा. रमेश पाटील बोरणारे हे देणार आहेत
---------------------------------------------------------------------------
0 Comments