शहर व तालुक्याच्या विकासासाठी कटिबध्द - आ.बोरनारे
वैजापूर, ता.21/प्रतिनिधी - 5 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वैजापूर शहरातील हुतात्मा जगन्नाथ भाजी मंडईच्या नवीन इमारतीच्या कामाचा भूमीपूजन सोहळा आ.रमेश पाटील बोरनारे यांच्याहस्ते रविवारी (ता.20) पार पडला.माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील गांधी रोडवर पालिकेने अनेक वर्षांपूर्वी उभारलेल्या हुतात्मा जगन्नाथ भालेराव भाजी मंडईची इमारत जुनी होऊन त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती.भाजी मंडईची जुनी इमारत पाडून त्या जागेवर नवीन इमारत व्हावी व भाजी मंडई पुन्हा त्याच ठिकाणी सुरू व्हावी यासाठी माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी पाठपुरावा केला व आ.रमेश पाटील बोरनारे यांच्याकडे यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. आ. बोरनारे यांच्या प्रयत्नामुळे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनी भाजी मंडईच्या नवीन इमारत बांधकामासाठी 5 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली.
भाजी मंडईच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आ.रमेश पाटील बोरनारे यांच्याहस्ते झाले. भाजी मंडईच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आ.बोरनारे यांचा शहरातील व्यापारी व फळ विक्रेत्यांनी यावेळी सत्कार केला.
आ.रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, डॉ. राजीव डोंगरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर, दामोदर पारीख, गौरव दोडे आदींची यावेळी भाषणे झाली. शहर व तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे आ.बोरनारे यावेळी म्हणाले. माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी आपल्या भाषणात आ.बोरनारे यांनी शहराच्या विकासासाठी आतापर्यंत जवळपास दोनशे कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला असून आ.बोरनारे यांच्यामुळे शहरात मोठ्याप्रमाणात विकासाची कामे झाल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, भाजपचे तालुकाध्यक्ष नारायण पाटील कवडे, खुशालसिंह राजपूत, एल. .एम.पवार, कय्यूमसेठ सौदागर, डॉ. निलेश भाटिया, तुषारसेठ पालेजा, व्यापारी संघटनेचे प्रकाशसेठ बोथरा, काशिनाथ गायकवाड, रवींद्रअप्पा साखरे, शोभाचंद संचेती, बाबुलाल संचेती, डॉ.अजित बोरा, संजय बोरनारे, रणजित चव्हाण, अमोल बोरनारे, हमीद कुरेशी, सुलतान खान, ज्ञानेश्वर जगताप, रहीम खान, फरदीन सय्यद, रियाजभाई भंगारवाले. श्रीराम गायकवाड, महेश बुणगे, आवेज खान, खलील मिस्तरी, मधुकर त्रिभुवन, बबन त्रिभुवन यांच्यासह शहरातील सर्व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments