छत्रपती संभाजीनगर,दि.२१ (जिमाका )- महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंगळवार, दि.२२ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा लोकनेते गोपीनाथराव मुंडे वंजारी भवन, न्यु हनुमान नगर कमानीजवळ, पाण्याच्या टाकीसमोर, पुंडलीक नगर रोड, एन-४, सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येणार आहे. मेळावा सकाळी साडेनऊ वा. सुरुवात होईल. या रोजगार मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, ते थेट मुलाखती घेणार आहेत.
नामांकीत कंपन्यांचा सहभाग
मेळाव्यात व्हेरॉक इंजिनिअरिंग लि., कॅनपॅक इंडिया प्रा. लि., टि. के. प्रेसिजन प्रा. लि., रूचा इंजिनिअरिंग, मेटलमन ऑटो, श्रेया लाईफ सायन्सेस, अलंकार इंजिनिअरिंग इक्विपमेंट, सवेरा फार्मा, कॉस्मो फिल्म्स, रेडिको एन. व्ही. डिस्टिलरीज, रत्नप्रभा मोटर्स, साई सुप्रीम इक्युपमेंट, एनआरबी बेअरिंग इ. नामांकीत कंपन्यांचा सहभाग आहे.
५४० रिक्त पदे
या रोजगार मेळाव्यात ५४० रिक्त पदांसाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, आय. टी. आय., बारावी (HSC), दहावी (SSC) उत्तीर्ण अशा विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेच्या उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
ऑनलाईन नोंदणी सुविधा
उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावर रोजगार नोंदणी करून, युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉगिन करून ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना काही अडचण आल्यास ०२४०-२९५४८५९ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
पात्र उमेदवारांनी मंगळवार दि.२२ रोजी सकाळी साडेनऊ वा. कार्यक्रमस्थळी उपस्थित रहावे व विविध नियोक्त्यांकडे थेट मुलाखती देवून रोजगाराची संधी मिळवावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुरेश वराडे यांनी केले आहे.
0 Comments