Today news, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासाठी सुधारित धोरण जाहीर

न्यायालयाच्या निर्देशानुसार नुसार सुधारित धोरण ; 150 दिवसांत अनुकंपा नियुक्ती 

मुंबई ता. 21- शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासाठी न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार सुधारित धोरण शासनाने जाहीर केले आहे. यात शैक्षणिक आणि वयोमर्यादेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागपत्रांमध्येही सुलभता आणली आहे.सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे धोरण शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा देणारे आहे.

अनुकंपा नियुक्ती योजना 1976 पासून लागू करण्यात आली आहे.सन 1994 मध्ये पूर्वीची योजना अधिक्रमित करून नवीन सुधारित योजना निर्गमित करण्यात आली.त्यानंतर सन 1994 च्या  योजनेमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या असून या योजनेनुसार अनुकंपा नियुक्ती देण्यात येते. सदर अनुकंपा धोरणात पुढील प्रयोजनास्तव सुधारणा करण्याची आवश्यकता दिसून येत आहे.
1) न्यायालयीन अडचणी प्रामुख्याने न्यायालयीन प्रकरणे उद्धवली आहेत. कुटुंबास अर्ज सादर करण्यास झालेला विलंब क्षमापित करणे, प्रतीक्षा सुचीवरील उमेदवार बदलणे, उमेदवाराचे नाव  वयाची 45 वर्षे पूर्ण झाल्याने वगळल्यास कुटुंबातील अन्य व्यक्तीचे नाव समाविष्ट करणे, या विविध न्यायालयीन प्रकरणी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार  अनुकंपा नियुक्ती योजना सुधारित करण्यात आली आहे.
2) अनुकंपा नियुक्तीस विलंब होत असल्याने प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची संख्या वाढत आहे.तरी कार्यवाहीतील विलंब टाळण्यासाठी काहीं तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली.
3) योजनेचे सुलभीकरण आवश्यक, सन 1994 पासून आजपर्यंत वेळोवेळी या विषयाबाबत एकूण 45 आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर प्रत्यक्ष नियुक्ती देत असताना हे विविध आदेश विचारात घ्यावे लागतात, तरी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला सर्व आदेश एकत्रित स्वरूपात मिळावेत यास्तव सर्व आदेशांचे एकत्रिकरण करणे.

अनुकंपा नियुक्ती कोणत्या परिस्थितीत अनुज्ञेय 

शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झाल्यास,त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे..तसेच बेपत्ता झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास सक्षम न्यायालयाने मयत घोषित केले असल्यास ,त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास देखील अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे.

कोणत्या पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय

गट - क आणि  गट - ड मधील ज्या ज्या संवर्गातील सरळ सेवा नियुक्तीचा मार्ग विहित केला आहे त्या सर्व संवर्गाच्या सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे. अनुकंपा नियुक्तीसाठी कुटुंबातील पात्र सदस्य प्राधान्यक्रमानुसार
अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहतील. नियुक्ती द्यावयाची त्याने नाहरकत नमुन्यामध्ये देणे आवश्यक आहे.तसेच वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे आहे.गट ड मधील अनेक संवर्गाची पदे ही संबंधित विभागाच्या सुधारित आकृतीबंधामध्ये बाह्य यंत्रणेमधून भरण्याबाबत निर्णय झाला असल्याने अनुकंपा नियुक्तीसाठी पदे उपलब्ध होत नाहीत. यास्तव या शासन निर्णयाच्या दिनांकापासून प्रथमतः 2 वर्षासाठी, गट ड च्या सरळसेवा कोट्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या 20 टक्के पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्याची मर्यादा शिथिल करून गट ड मधील जरवधी पडसंख्या मृत घोषित केली आहे त्या पदसंख्येच्या मर्यादित अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पुनर्जीवित करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास देण्यात येत आहेत.शासन निर्णयाच्या दिनांकापासून 2 वर्षानंतर गट ड च्या प्रतिक्षासुचीतील उमेदवाराची संख्या विचारात घेऊन मर्यादा शिथिल करण्याबाबत पुनर्विचार करण्यात येईल.

150 दिवसांत अनुकंपा नियुक्ती 

उपलब्ध रिक्त पदांची परीगणना करणे
गट ड मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय विभागास पाठविणे.
पूर्व तयारी - नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाने सर्व कार्यवाही 15  ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करावी.
आढावा बैठक - जिल्हाधिकारी यांनी 18 ऑगस्ट 2025 रोजी सर्व नियुक्ती प्राधिकारी यांची बैठक आयोजित करून त्यांच्याकडून माहिती संकलित करणे.
गट ड ची पदे पुनर्जीवित करणे - नियुक्ती पदाधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार गट ड ची पदे पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय विभागास पाठविणे.

मेळावा घेणे व शिफारस करणे

जिल्हाधिकारी यांनी 1 सप्टेंबर 2025 रोजी उमेदवारांचा मेळावा आयोजित करून उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करणे. 
गट ड साठी मृत पदे पुनर्जीवित करणे.-  नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून  प्राप्त प्रस्तावानुसार संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिकारात गट ड ची पदे 1सप्टेंबर 2025 पर्यंत पुनर्जीवित करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. जिल्हाधिकारी कार्यालयाने गट क च्या पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करणे.



Post a Comment

0 Comments