वैजापूर, ता. 2 / प्रतिनिधी -- वैजापूर तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील निराधार एकल महिलांच्या पाल्यांच्या शैक्षणिक विकासासाठी निर्भय सर्वांगीण विकास संस्था व साउ एकल महिला समितीच्यावतीने संवेदनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शालेय साहित्यात जेवणाचा डबा, टिफीन बॅग, वेगवेगळ्या वह्या , पुस्तक , रजिस्टर, पाणी बॉटल, लिहिण्यासाठी पॅड, कंपास, बुट, स्कूल बॅग या साहित्यांचा समावेश होता. पुष्गुच्छ व संविधान ग्रंथाची एक प्रत भेट देऊन सन्मानपूर्वक हे साहित्य वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या प्रसंगी प्रास्ताविक मध्ये संस्था प्रमुख- बाबासाहेब वाघ यांनी एकल महिलांच्या व पाल्यांच्या समस्या सामाजिक आडसर समाजातील सहानुभूतीची आवश्यकता व संस्था राबवत असलेल्या वेगवगळ्या उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या मंजुषाताई ठाकरे त्याया होत्या तर प्रमूख पाहुणे म्हणून एच..आर. बोरनारे (मा. गटविकास अधिकारी) आनंद मगर (रोहियो योजना प्रमूख) सतीश कदम (बालसंगोपन व स्वरक्षण अधिकारी) प्रशांत त्रिभुवन (संचालक कृ.उ.बाजार समिती) अनिल शिंदे नारळकर, जेजुरकर (सांस्कृतिक कलामंच) अण्णासाहेब हेंगडे (मागासवर्गीय विध्यार्थी वसतिगृह) संचालक दिलीप अनर्थे (नाभिक महामंडळ) गणेश चौकडे, नितीन गवळी (निवडणूक विभाग वैजापूर) , संतोष त्रिभुवन (पंचायत समिती.वैजापुर) यांची उपस्थिती लाभली होती. आपल्या मनोगतात प्रमूख पाहुण्यांनी एकल महिला शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वेगवगळ्या योजनांची माहिती देऊन पुढील काळात या योजनांसाठी आमच्या विभागात अर्जं करावे.आम्ही एकल महिलांच्या अर्जांचा विशेष विचार करू असे आश्वासन दिले.
यावेळी एकल महिला समितीच्या महिलांच्यावतीने प्रमूख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी वर्षाताई भवर, मंगल ताई जाधव, सविता राजदेव, नंदाताई कोकाटे, गीताताई फुलारे, नंदाताई साळवे, सविताताई जाधव, कैलास सातपुते, सागर बागुल पानवकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता परिषदेचे जगन्नाथ गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार भारतीताई कदम यांनी केले.
0 Comments