Today news, सदगुरू गंगागिरी महाराज 178 वा हरिनाम सप्ताहाचे नारळ महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते शनिदेवगांव सप्तकृषीला



वैजापूर, ता.21/ प्रतिनिधी - योगीराज सदगुरू गंगागिरीजी महाराज 178 वा अखंड हरिनाम सप्ताहाचे नारळ श्री क्षेत्र पुणतांबा येथे शनि देवगांव सप्त कृषिला सोमवारी (त.21) महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते देण्यात आले. सदगुरू गंगागिरी महाराजांनी स्वातंत्र्यापूर्वी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह अखंडपणे सुरू आहे. सप्ताहाचे हे 178 वे वर्ष आहे. यंदा तालुक्यातील सप्ताह श्री क्षेत्र शनिदेवगाव येथे आयोजित करण्यात येणार असून,  शनिदेवगाव, चेंडुफळ, बाजाठाण, अव्वलगाव, हमरापूर, भामाठाण, कमलापूर या सात गावांकडून या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, शनिदेवगाव सप्तकृषी सप्ताह कमिटी व भाविक वर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments