वैजापूर, ता. 22 /.प्रतिनिधी - करुणा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व करुणा माता चर्च स्टेशन रोड वैजापूर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके व शहर अध्यक्ष अशोक देवकर यांनी केले होते.
या कार्यक्रमा प्रसंगी करुणा निकेतन माध्य.शाळा संचालक तथा मुख्याध्यापक डॉ संजय ब्राम्हणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते अँड. प्रतापराव निंबाळकर, तालुकाध्यक्ष विजय पवार, माजी सभापती एल. एम. पवार, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष सुधाकर बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, जिल्हा उपाध्यक्ष रमेश आण्णा चोभे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष नितीन आबा तांबे, सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष रमेश शिनगारे, तालुका उपाध्यक्ष आबासाहेब कळमकर, तालुका उपाध्यक्ष विजय खोमणे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बोधक सर, शिक्षक साळवे, भडके, गायकवाड सर, प्रकाश शेरे, पवार, रवि शेरे, प्रसाद, ब्रदर सर, श्रीमती उगले, श्रीमती चव्हाण, श्रीमती पवार, श्रीमती रोमा मॅडम व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments