वैजापूर, ता 22 / प्रतिनिधी - तालुक्यातील चिंचडगाव येथील खुन प्रकरणातील आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली.
विजय पुंजाराम वाघ (वय 46 वर्ष) रा. चिंचडगाव असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आली.
सामाईक बांधाच्या कारणावरून काठीने मारहाण करून सुनिल कडुबा वाघ या व्यक्तीचा खुन करण्यात आला होता. ही घटना सहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास चिंचडगाव येथे घडली होती. या प्रकरणी विजय पुंजाराम वाघ व पोपट लहानू वाघ या दोन जणांविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी तो जेलमधून सुटला होता.
या प्रकरणातील आरोपी विजय वाघ याने पत्र्याच्या शेडला दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार मनोज कुलकर्णी हे करीत आहेत.
0 Comments