news today, गोदावरी खोऱ्यात धरणांच्या जलसाठ्यात वाढ ; नाशिक जिल्ह्यातील धरणांत 3 जुलैपर्यंत 56.95 टक्के पाणीसाठा


नाशिक - गेल्या  दोन-तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून, नद्या, नाल्याना पूर आला आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यातच आनंदाची बाब म्हणजे, राज्यातील बहुतांश धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली आहे. मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक जलसाठा असून मराठवाड्यातील बहुतांश धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

गोदावरी खोऱ्यातील नाशिक जिल्हयात बहुतांश धरण क्षेत्रामध्ये  चांगला पाऊस झाल्याने गेल्यावर्षी 17 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा यंदा 56.95 टक्क्यांवर आहे. गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समूहातून 1जूनपासून आतापर्यंत नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 14 हजार 152 दसलक्ष घनफूट म्हणजेच 14.152 टीएमसी पाणी गोदावरीत सोडण्यात आले असून ते जायकवाडी जलाशयाकडे वाहून गेले आहे.  गंगापूर धरणातून गुरुवारी (ता. 03) दुपारी बारा वाजता 3716 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरीत सुरू झाला असून, नाशिकमध्ये रामकुंड परिसरातील छोटे मोठे मंदिर पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.

नाशिक जिल्ह्यात छोटी मोठी 25 धरणे असून प्रमुख धरणात 3 जुलै पर्यंतचा पाणीसाठा पुढीप्रमाणे...

दारणा - 111.340 द.ल.घ.मी.   (55 टक्के)
मुकणे  - 124.032 द.ल.घ.मी.  (60.65 टक्के
वाकी  -  51.55  द.ल.घ.मी.      (73.05 टक्के)
भाम.  -   57.08. द.ल.घ.मी.     (81.82 टक्के)
भावली -  39.44 द.ल.घ. मी.    (97.14 टक्के)
वालदेवी - 24.99 द.ल.घ.मी.     (77.87 टक्के)
गंगापूर   - 97.08 द.ल.घ.मी.     (60.90 टक्के)
कश्यपी  - 56.50 द.ल.घ.मी.     (107.74 टक्के)
पालखेड - 12.62 द.ल.घ.मी.     (68.42 टक्के)
नांदूर मधमेश्वर बंधारा - 4.45.द.ल.घ.मी.  (61.21टक्के)

याबरोबरच अहिल्यानगर जिल्हयातून मराठवाड्याकडे पाणी प्रवाही होत असल्याने जायकवाडी धरणात गुरुवारपर्यंत 989 दसलक्ष घनमीटर म्हणजेच 45.56 टक्के जलसाठा झाला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच दरम्यान या धरणात केवळ 4.40 टक्के इतकाच साठा होता.  धरण परिचालन सूचीनुसार ऑगस्टपर्यंत मोठ्या धरणांमध्ये 88 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा करता येत नाही.

Post a Comment

0 Comments