news today, आ. बोरणारे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा ; शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी


वैजापूर, ता.28/ प्रतिनिधी - तालुक्याचे आमदार रमेश पाटील बोरणारे यांचा 58 वा वाढदिवस रविवारी (ता.27) विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. आमदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वाढदिवसानिमित्त आ.बोरणारे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधानसभा सदस्य आणि मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

आ. बोरनारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहर व ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविण्यात आले. वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, गरजू कुटुंबांना घरगुती साहित्य वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले. 
आ. बोरणारे यांच्या निवासस्थान जवळील शिवसेना भवनात वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, मा. नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, माजी जिल्हा परिषद सभापती ॲड. प्रमोद जगताप, डॉ. राजीव डोंगरे, जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके, बाजार समितीचे सभापती रामहरीबापू जाधव, ॲड. नानासाहेब जगताप, दिपक साळुंके, ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, सुलतान खान, हमीद कुरेशी, प्रशांत शिंदे, रहीम खान, खलिल मिस्तरी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी आ. रमेश बोरणारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आ.बोरणारे यांनी सायंकाळी श्रीक्षेत्र सराला बेट येथे जाऊन बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

Post a Comment

0 Comments