news today, वैजापूर बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू

शिवूर येथील बाजार समीतीच्या वाॅल कंपाऊंड कामाचे एक कोटीचे टेंडर रद्द ; 18 पैकी 16 संचालक विरोधात

वैजापूर ता .29 / प्रतिनिधी- वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरीबापू जाधव हे संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्याने त्यांच्याविषयी  संचालक मंडळात नाराजी व्यक्त होत आहे. अठरा पैकी सोळा संचालक त्यांच्याविरोधात गेले असून सभापती जाधव यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवूर उपबाजाराच्या वाॅल कंपाऊंड कामासाठी काढण्यात आलेले एक कोटी रुपयांचे टेंडर संचालकांनी मासीक सभेत रद्द ठरविले आहे. या कामात सभापती रामहरी जाधव यांनी आर्थीक देवाण घेवाण केल्याचा संशय वाटत असल्याने अठरा पैकी सोळा संचालकांनी हा निर्णय घेतल्याने सभापती रामहरी जाधव चांगलेच अडचणीत आले आहेत.

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासीक सभा सोमवारी बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आली.या सभेत संचालक मंडळाने विवीध मुद्द्यावर सभापती रामहरी जाधव यांना चांगलेच धारेवर धरले. शिवूर उपबाजारच्या वाॅल कंपाऊंडच्या कामाचे टेंडर एक कोटी रुपयांत ठेकेदार डी. बी फोपसे यांना मिळाले होते. हे काम त्रयस्थ कपिल आसर यांना फोपसे यांनी करण्यासाठी दिले होते. या कामाचे टेंडर एप्रिल महिन्यात मिळाले होते .तसेच कार्यारंभ आदेश देखील देण्यात आला होता.परंतू अंदाज पत्रक बनविणारे व सुपरवायझर  देखील आसर हेच आहेत.त्यामुळे ठेकेदार,सुपरवायझर व अंदाज पत्रक बनविणारा व्यक्ती हे एकच असल्याने या टेंडरला विरोध झाला.तसेच सभापती रामहरी जाधव यांनी या कामात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय संचालकांनी व्यक्त केला.त्यामुळे हे एक कोटीचे टेंडर रद्द करण्याचा ठराव संचालकांनी केला.तसेच मासीक सभेत विषय पत्रिकेवरील सर्वच विषय रद्द ठरविण्यात आले.त्यामुळे खळबळ उडाली असली तरी संचालक मंडळाने ही बाब उघड करण्यासाठी गुप्तता बाळगली आहे.
सोमवारी ठेवण्यात आलेले सर्व विषय रद्द करण्यात आल्याची माहिती एका ज्येष्ठ संचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.दोन तीन वादांचे प्रश्न आहे.या प्रश्नावरून संचालक सभापती वर नाराज आहेत.


सभापती रामहरी जाधव यांच्यावर अविश्वास आणण्याच्या हालचाली सुरू 

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव हे मनमानीपणे काम करीत असल्याने सर्वच संचालकांची त्यांच्याबाबत नाराजी आहे. शासनाने सहा महिन्यापुर्वी वखार महामंडळाची दहा एकर जागा बाजार समीतीला लीजवर दिली आहे.या जागेचा विकास देखील सभापती रामहरी जाधव यांना अद्याप करता आलेला नाही.विवीध कारणांनी बाजार समीती गाजत आहे.त्यास निष्क्रिय सभापती जबाबदार आहे.अडीच वर्षांपूर्वी संचालक मंडळाची निवडणूक झाली.शिंदे सेना व भाजपच्या ताब्यात ही बाजार समिती ताब्यात आली.त्यावेळी सर्व संचालकांना संधी मिळावी.यासाठी सभापती - उपसभापती यांना एक एक वर्षाचा कालावधी देण्याचे ठरले. पहिले सभापती पद रामहरी जाधव यांना देण्यात आले.मात्र अडीच वर्षे होऊन देखील जाधव हे राजीनामा देत नसल्याने अन्य संचालकामध्ये नाराजी पसरली.त्यामुळे सभापती रामहरी जाधव यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली संचालकांनी सुरू केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments