फडणवीस यांच्याप्रमाणे मी पुन्हा येईन - अंबादास दानवे
मुंबई ता.16 - विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषद सदस्य कार्यकाळ 29 ऑगस्ट 2025 रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांना विधान मंडळातर्फे बुधवारी (ता.16) सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला..
निरोप समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी ठसा उमटवला, त्यांचा लढाऊ बाणा आणि समर्पित नेतृत्व सभागृहात कायम स्मरणात राहील.असे सांगितले. तर शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उध्दव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामाची प्रशंसा करून शिवसैनिक ते विरोधी पक्षनेता हा प्रवास आज तूर्तला संपला असला तरी जनतेपर्यंत जाऊन अजून खूप काम बाकी आहे असे म्हणत दानवेंनी विधानपरिषद जाता जाता का होईना पुन्हा गाजवली, मला त्याचा अभिमान आहे असे सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दानवे यांच्या राजकीय कार्याचे आणि संघर्षमय कौतुक केले. दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेते असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोपविलेली विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न केला असे सांगून ही जबाबदारी पार पाडतांना मदत व सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे 'मी पुन्हा येईन.. पण कुठून येईल' ते विचारू नका असे दानवे म्हणाले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
दानवे यांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होत होत आहे. या. निमित्ताने त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रथेप्रमाणे विधान मंडळाच्या पायऱ्यांवर सर्व पिठासीन अधिकारी, दोन्ही सभागृहातील सदस्य, विधान मंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांचे एकत्रित छायाचित्र घेण्यात आले.
0 Comments