today news, जनावरांच्या खरेदी - विक्रीवर अनिश्चित काळासाठी बहिष्कार ; जमियत-उल-कुरेश छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखेचा निर्णय



मांस विक्रीची दुकाने अनिश्चित काळासाठी बंद 

छत्रपती संभाजीनगर, ता.16  - गोवंश रक्षणाच्या नावाखाली वारंवार काही मंडळींकडून त्रास देण्याच्या आणि हल्ल्याच्या घटना होत असल्याचा आरोप येथे गुरांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारातील गुरांच्या खरेदी विक्रीवर अनिश्चित काळासाठी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून बुधवारपासून (ता.11) या अनिश्चित बहिष्कारास सुरुवात झाल्याचे येथे सांगण्यात आले. या संदर्भात भारतीय जमियत - उल - कूरेशच्या छत्रपती संभाजीनगर शाखेच्यावतीने पोलीस व प्रशासनाला निवेदन  देण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 लागू करून महाराष्ट्रात गोहत्याबंदी केली होती; त्याला पुढच्या वर्षी 50 वर्षे पूर्ण होतील. महाराष्ट्रातील विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या मागील कार्यकाळात 2015 मध्ये मूळ अधिनियमात बदल करून 'गोवंश हत्याबंदी ' (सुधारित) कायदा 2015 लागू केला गेला त्याला यंदा मार्च महिन्यात दहा वर्षे पूर्ण झाली.या कायद्यानुसार नुसत्या गाईच्याच नव्हे तर एकूणच गोवंशाच्या हत्त्येवर, त्याच्या मांस. विक्रीवर, त्याचे मांस बाळगण्यावर, परराज्यातून त्याचे मांस आणण्यावर बंदी घालण्यात आली. योगायोग म्हणजे याच कायद्याच्या दशकपूर्तीच्या वर्षी.भारतीय जमीयत - उल - कुरेश च्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखेने 11 जुलैपासून मोठ्या प्राण्यांच्या मांसाची दुकाने आणि तत्संबंधी एकूण सगळेच व्यवहार अनिश्चित काळासाठी बंद करण्याची घोषणा केली आणि त्याची अंमबजावणीही सुरू केली.
 त्यांचा मुख्य रोष आणि आक्षेप आहे तो त्यांच्याकडे कायदेशीर परवाने असतांनाही पोलिसांकडून आणि काही असामाजिक तत्वांकडून त्यांना दिला जाणारा त्रास आणि केला जाणारा छळ.त्यावर त्यांचा हा आरोप आहे .

Post a Comment

0 Comments