आवेज खान
----------------------
वैजापूर, ता. 17 - तालुक्यातील खंडाळा गावात काही दिवसांपूर्वी दोन गटात वाद होऊन एका तरुणाचा खून झाला होता. या घटनेनंतर गावामधे तणाव निर्माण झाला होता. गावात निर्माण झालेली परिस्थिती योग्य रीतीने हाताळून गावात शांतता प्रस्थापित केल्याबद्दल वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांचा पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.
पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी वैजापूर पोलीस ठाण्याचे पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांनंतर  खंडाळा गावात पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी होऊन एका 25 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर खंडाळा गावात तणाव निर्माण झाला होता. 
नव्यानेच रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासमोर हे प्रकरण योग्यरीतीने हाताळण्याचे आव्हान होते.
पोलीस निरीक्षक ताईतवाले यांनी गावात निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणून घटनेतील आरोपींना तत्काळ अटक केली व ग्रामस्थांच्या बैठका घेऊन गावांत शांतता प्रस्थापित केली. या कामगिरीबद्दल पोलीस विभागातर्फे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांचा पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
 
0 Comments