political news, व्हिलनच्या भूमिकेतून मुस्लिमांची सुटका कधी - अँड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल


नागपूर - स्वातंत्र्यापासून देशातील मुस्लिमांना व्हिलनच्या भूमिकेत बसविण्यात आले. वास्तविक पाकिस्तानातील मुस्लिम आणि भारतीय मुस्लिमांमध्ये टोकाचा फरक आहे.भारतीय मुस्लिमांमधील संत परंपरा पाकिस्तानात नाही, याकडे डोळेझाक केली जाते. गेल्या 75 वर्षांपासून बसविलेल्या व्हिलनच्या भूमिकेतून देशातील मुस्लिमांना सुटका कधी करणार असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड.प्रकाश आंबेकर यांनी राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या भूमीत नागपूर येथे रविवारी (ता.29) उपस्थित केला.

आंबेडकर म्हणाले, देशातील मुस्लिम भविष्यात छातीवर बसतील अशी   ओरड धर्मांध शक्ती स्वातंत्र्यापासून करीत आहे.आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली तरी आपण व्हिलनच्या भूमिकेतून मुस्लिमांची सुटका करायला तयार नाहीत. भारतीय मुस्लिमांच्या बाबतीत भूमिका बदलणे काळाची गरज आहे. देशातील सनातनी विचारसरणीचे लोक अविकसित समाजाचे नेतृत्व करीत असल्याने गुळगुळीत राजकारणाचे पेव फुटले आहे.

Post a Comment

0 Comments