मुंबई, ता .15 - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची तर मुख्य सचिवपदी रोहित पवार यांची निवड करण्यात आली. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मंगळवारी (ता.15) पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत या निवडीची घोषणा करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निवड झाल्याचे जाहीर केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात मोठे फेरबदल करण्यात असून आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आपण अध्यक्षपदावरून पायउतार झालो तरी पक्ष सोडणार नाही असे मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून जबाबदारीतून मुक्त होण्याचे संकेत त्यांनी दिले होते..
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापदिनाच्या कार्यक्रमात पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासमोरच पदापासून बाजूला होण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यानुसार.राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली. जयंत पाटील हे सात वर्षांपेक्षा अधिक काळ प्रदेशाध्यक्षपदी होते. पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यावर शरद पवार यांनी जयंत पाटील यांना पदमुक्त करून शशिकांत शिंदे यांची निवड करण्याचा निर्णय घेतला. मावळते अध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या सात वर्षाच्या कारकीर्दीचा उहापोह केला. शरद पवार यांचा निर्णय मी नेहमीच अंतिम मानला आहे. त्यांच्यापुढे काही नाही असे सांगत मी जात असलो तरी पक्ष सोडणार नाही असे सांगून पक्ष सोडत नाही असे सांगून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला विराम दिला.
0 Comments