वैजापूर, ता. 15/ प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य पुर्व प्राथमिक (अंगणवाडी) शिक्षक भारतीतर्फे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना मंगळवारी (ता.15) रोजी आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन देण्यात आले.
शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे मंत्रालयात मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन दिले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या सचिवांनी निवेदन स्वीकारले. अंगणवाडी सेविका यांना कामासंदर्भात येणाऱ्या अडचणी व अन्य प्रश्नांविषयी यावेळी सविस्तर चर्चा केली. तसेच यासंदर्भात लवकरच अंगणवाडी सेविका यांच्या प्रश्नासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत बैठक ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आमदार कपिल पाटील, संघटनेचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, कोषाध्यक्ष किशोर कदम, उपाध्यक्ष विनोद कडव, शिक्षक भारती पदाधिकारी, अंगणवाडी शिक्षक भारती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष माया म्हस्के, रायगड जिल्हाध्यक्ष घाडगे ताई, आशा देशमुख, आरती वादळ, अश्विनी सोनवणे, कल्याणी ताई आदी यावेळी उपस्थित होते.
0 Comments