today news, विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स विकसित करण्याची गरज - विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठाणतर्फे समाजातील गुणवंतांचा सत्कार 
 

छत्रपती संभाजीनगर, ता,14 / प्रतिनिधी -
मराठवाडा विभागातील विद्यार्थी वर्गात बुद्धीमत्ता मोठ्याप्रमाणात आहे, मात्र त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सॉफ्ट स्किल विकसित करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन मराठवाडा विभागाचे आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी रविवारी (ता.13 )  एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या राजपूत भामटा / परदेशी भामटा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, सेवानिवृत व  विविध क्षेत्रात उल्लेखनीय उल्लेखनीय करणाऱ्या व्यक्तीच्या सत्कार सोहळ्यात बोलताना केले.

राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठाण संभाजीनगर यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तोताराम बहुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्कार सोहळ्यास अप्पर विभागीय आयुक्त खुशालसिंह राजपूत, मुख्याधिकारी भागवत बिघोत, डॉ.भगवानसिंह डोभाळ, रामसिंग बहुरे, विठ्ठलसिंग परदेशी, माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सुरुवातीला महापुरुषांना अभिवादन व दीप प्रज्वलन करण्यात आले. विभागीय अप्पर आयुक्त खुशालसिंग राजपूत यांनी श्री.पापळकर यांचा परिचय करून दिला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ,भगवानसिंग डोभाळ, रामेश्वरीताई गोलवाल यांचीही  मार्गदर्शनपर भाषणे झाली. सूत्र संचलन सुभाष महेर यांनी केले आभार विजू मारग यांनी मानले..जवळपास दोनशे गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला. या प्रसंगी राजपूत /परदेशी समाजातील महाराष्ट्रातील विविध भागातून गुणवंत व मान्यवर उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments