वैजापूर, ता.11/ प्रतिनिधी - तालुक्यातील भऊर गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जुनी व जीर्ण झालेली होती. त्या इमारतीसाठी आ. रमेश पाटील बोरणारे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणल्याबद्दल गंगथडी भागातील ग्रामस्थांच्यावतीने आमदार बोरणारे यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील जगताप, माजी सरपंच योगेश डोखे ( डोणगांव),
दत्ता पाटील ठोंबरे (उपसरपंच पुरणगांव), योगेश घंगाळे (सरपंच नांदूरढोक) यांनी मुंबईला येथे जाऊन गंगथडी भागातील तेरा गावांतील ग्रामस्थांच्यावतीने आमदार रमेश पाटील बोरणारे यांचा सत्कार केला व निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
या पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत गंगथडी भागातील भऊर, खंबाळा, डवाळा, सुराळा, हिंगोणी, कंगोणी, किरतपूर, नगीना पिंपळगाव, पुरणगांव, बाबतारा, डोणगांव, लाखगंगा, गोयगांव
ही तेरा गांवे येत असून या गावांना पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.
0 Comments