Today news, ऑलिम्पिक दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक आता मराठवाड्यात ; तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश


छत्रपती संभाजीनगर ता.23 - छत्रपती संभाजी नगरमध्ये तेजस शिरसे, साक्षी चव्हाण यासारखे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. परंतु सिंथेटिक ट्रॅक नसल्यामुळे यांना प्रॅक्टिससाठी बाहेर जावे लागत असे. 17 सप्टेंबर 2021 मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव अंतर्गत विविध विकास कामाचे सादरीकरण त्यावेळचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी केले होते.

आज या सिंथेटिक ट्रॅकचे 60% काम पूर्ण झाले आहे. मराठवाड्यातील पहिला आणि देशातील सर्वात मोठा ट्रॅक लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाचे स्वप्न साकारण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी
 भारत सरकारच्या "खेलो इंडिया" या योजनेतून राज्य शासनास प्रस्ताव सादर केला. पुढे हा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनास पाठविला. माजी मुख्य सचिव डी.के.जैन यांनी यासंदर्भात केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. स्मृती सुजाता चतुर्वेदी (माजी केंद्रीय क्रीडा सचिव) यांनीही याकामी महत्त्वाची भूमिका निभावली. संभाजीनगर येथील खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय खेळ बघता, ही संकल्पना जिल्हाधिकारी चव्हाण यांना सुरेंद्र मोदी (नॅशनल कोच) यांनी सुचवली होती.

या ऐतिहासिक प्रकल्पाच्या वाटचालीत जिल्हाधिकारी चव्हाण यांचे योगदान आहे. ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या प्रकल्पाबाबत माहिती देताना सांगितले. 


Post a Comment

0 Comments