सावता माळी महाराज मंदिरात विविध कार्यक्रम ; गुरुवारी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन
वैजापूर ता.23 / प्रतिनिधी - संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या ७२९ व्या पुण्यतिथी निमित्ताने शहरातील माळी गल्ली येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने बुधवार (ता,23) रोजी येथील माळी गल्लीतील संत सावता महाराज मंदिरात भागवताचार्य ह.भ.प. गोवर्धन महाराज देवळे यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आयोजक गौतम गायकवाड, सजनराव गायकवाड, रतीलाल गायकवाड, सचिन राजपूत व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत तसेच जेष्ठ नागरिक श्रीमती सिता मावशी गायकवाड, सुमनबाई गायकवाड, जिजाबाई गायकवाड यानी संत सावता महाराज यांच्या चरणी पुष्प अर्पण करून अभिवादन केले..धोंडीराम राजपूत यांनी संत सावता महाराज यांच्या जीवन चरित्राबाबत माहिती दिली. गौतम गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर सजनराव गायकवाड यांनी आभार मानले.
या प्रसंगी रविंद्र गायकवाड, विजय गायकवाड, सुनील गायकवाड, संजय गायकवाड, तुकाराम गायकवाड, अशोक गायकवाड यांच्यासह उत्सव समिती सदस्य व सर्व भजनी मंडळी उपस्थित होते. या निमित्ताने गेल्या आठ दिवसापासून संत सावता महाराज मंदिरात काकड आरती, हरिपाठ, भागवत कथा, कीर्तन प्रवचन चालू आहे. गुरुवारी काल्याचे कीर्तन, प्रवचन, प्रतिमा मिरवणूक व महाप्रसाद वाटप संत सावता महाराज मंदिर व ओंकारेश्वर मंदिर आनंदनगर स्टेशन रोड येथे होणार आहे.
0 Comments