agriculture news, एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याने शेतकऱ्यांत संताप

पीक विम्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविणार

वैजापूर, ता .23 / प्रतिनिधी -मागील काही वर्षापासून सुरु असलेली शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची एक रुपयात पीक विमा ही योजना अचानक शासनाने बंद केल्याने शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. ही योजना परत सुरू करावी या मागणीसाठी वैजापूर तालुकाभर साक्षरी मोहीम राबवणार असल्याचे शासकिय पिक विमा तक्रार निवारण समितीचे सदस्य संतोष सुर्यवंशी यांनी सांगितले. 

एक रुपयात पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत होता. तसेच नापिकी , दुष्काळ , अतिवृष्टी अश परिस्थितीत शेतकऱ्यांना विम्याचे स्वरक्षण मिळत होते. मात्र, गाजावाजा करून सुरू केलेली ही योजना अचानक बंद का करण्यात आलीअसा सवाल शेतकरी करत आहेत. ठराविक ऑनलाइन सेंटर चालक आणि काही अधिकाऱ्यांमुळे  झालेल्या विमा घोटाळ्याची शिक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांना का देता असा सवाल सुर्यवंशी यांनी केला. 

तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त सहया घेवून ही साक्षरी मोहीम राबवून या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे त्यानी सांगितले असून या विषयावर तोडगा निघाला नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यानी दिला आहे.

शेतकऱ्यांचा काय दोष?

एक रुपयात पिक विमा ही शेतकऱ्यांसाठी खुप लाभदायक योजना होती पण आता ही योजना अचानक बंद केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल या निर्णयावर शासनाने फेर विचार करावा - संतोष सुर्यवंशी, शेतकरी नेते

Post a Comment

0 Comments